Titanic पेक्षा चारपटींनी सर्वाधिक मोठे आहे हे जहाज, जाणून घ्या खासियत
जगातील सर्वाधिक मोठे जहाज 'आयकॉन ऑफ द सी' आपल्या पहिल्या प्रवासासाठी रवाना झाले आहे. या जहाजाने अमेरिकेतील मियामी बंदरावरुन आपला पहिला प्रवास सुरू केलाय.
रॉयल कॅरेबिअन ग्रुपचे Icon of The Seas जहाज अत्यंत आलिशान आहे. जहाज सात दिवसात प्रवास पूर्ण करत फ्लोरिडा येथे पोहोचणार आहे. या जहाजाची क्षमता टायटॅनिक जहाजाच्या चारपट अधिक आहे.
टायटॅनिक जहाजातून दोन हजार दोनशे प्रवासी प्रवास करू शकत होते. पण 'आयकॉन ऑफ द सी' जहाजातून तब्बल आठ हजारजण प्रवास करू शकतात.
‘आयकॉन ऑफ द सी’ जहाजाचे वजन 2 लाख 50 हजार 800 टन आहे. जे 31 हजार 500 हत्तींच्या समान आहे.
‘आयकॉन ऑफ द सी’ जहाज 20 मजली असून याची लांबी 1200 फूट आहे. जहाजातून 5650 प्रवासी आणि 2350 क्रू मेंबर्स प्रवास करू शकतात.
‘आयकॉन ऑफ द सी’ जहाजात सहा मल्टीफ्यूज इंजिन लावण्यात आले आहेत. जे 90,500 हॉर्सपॉवर फोर्स देतात. याशिवाय जहाजाचा वेग 41KM प्रति तास आहे.
आयकॉन ऑफ द सी जहाजात सात स्विमिंग पूल आणि सहा वॉटर स्लाइड्स आहेत. कंपनीने दावा केलाय की, जहाजात जगातील सर्वाधिक मोठ्या वॉटर राइड्स आहेत.
‘आयकॉन ऑफ द सी’ जहाजाचे काम 14 महिन्यात पूर्म झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जहाच्या निर्मितीचे काम वर्ष 2022 मध्ये सुरू झाले होते.
‘आयकॉन ऑफ द सी’ जहाजावर जवळजवळ 40 रेस्टॉरंट आहेत. क्रुजवर 28 प्रकारचे केबिन, थीम पार्क आणि डाइनिंग सारखी सुविधा आहे.