तातडीने बंद करा अशा प्रकारचे बँक खाते, अन्यथा होईल मोठे नुकसान
Lifestyle Feb 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
एकापेक्षा अधिक बँक खाते
आजकाल बहुतांशजण आपले एकापेक्षा अधिक बँक खाते सुरू करतात. खरंतर तुम्ही अधिकाधिक बँक खाते सुरू करू शकता. पण एकापेक्षा अन्य खात्यांचा वापर करत नसाल तर ते बंद करा.
Image credits: social media
Marathi
अशाप्रकारचे खाते करा बंद
ज्या बँक खात्याचा तुम्ही वापर करत नाही ते बंद करा. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
निष्क्रिय खाते
बहुतांश बँक खात्यांमध्ये कमीतकमी रक्कम ठेवणे अनिवार्य असते. खात्यातील रक्कम 500 ते 15 हजार रुपयांपर्यंत असू शकते. पण खात्यात नियमानुसार कमीतकमी रक्कम नसल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
Image credits: stockPhoto
Marathi
झिरो बॅलेन्स खाते
झिरो बॅलेन्स असणाऱ्या सॅलरी खात्यात तीन महिन्यांपर्यंत पगार न आल्यास असे खाते बचत खात्यात रुपांतरित होते.
Image credits: stockPhoto
Marathi
निष्क्रिय बँक खात्याचे नुकसान
निष्क्रिय बँक खात्याच्या डेबिट कार्ड व SMS शुल्क तुमच्याकडून आकारला जातो. डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 100 रुपये स्विकारला जातो.
Image credits: stockPhoto
Marathi
ITR भरताना समस्या
ITR भरताना तुम्हाला सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागते. यासाठी बँक स्टेटमेंटची आवश्यकता असते. अशातच निष्क्रिय बँक खात्याचे स्टेटमेंट देण्याची प्रक्रिया फार किचकट असते.
Image credits: stockPhoto
Marathi
फसवणूक होऊ शकते
निष्क्रिय खात्याच्या माध्यमातूनही तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे वेळीच निष्क्रिय खाते बंद करावे.