जर वजन वेगाने कमी होत असेल तर यामुळे महिला आनंदी होतात, पण हे काही गंभीर आजरांचे लक्षण असु शकते. वेगाने वजन कमी होणे टीबी, कॅन्सर, थायरॉईड अशा आजरांचे लक्षण असु शकते.
काही महिलांना पुरेशी झोप घेतली तरी सतत थकवा जाणवतो, हे हृदय, किडणी यांच्याशी संबंधित आजरांचे किंवा फर्टीलिटी संबंधित समस्यांचे लक्षण असु शकते.
दिवसभरात ५० ते १०० केस गळणे सामान्य गोष्ट आहे, पण त्याहून अधिक अति केसगळती होणे ऑटो इम्युन सिस्टीम डिसॉर्डर किंवा थायरॉईडचे लक्षण असू शकते.
मासिक पाळी येण्याअगोदर महिलांना गॅसची समस्या जाणवते. पण जर याचा त्रास सतत होत असेल आणि यासह जास्त वेदना आणि रक्तस्त्राव होत असेल तर हे एंडोमेट्रिओसिस चे लक्षण असु शकते.
मासिक पाळी अनियमित होणे यूटेरिन फाइब्रोआइड, पॉलिसिस्टिक ओवरियन सिंड्रॉम, थायरॉईड या आजरांचे लक्षण असु शकते.