Marathi

कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका !

Marathi

अनपेक्षितपणे वजन कमी होणं

कर्करोगानं ग्रस्त बहुतेक रुग्णांचं आजाराच्या एखाद्या पातळीवर वजन कमी होतं.जेव्हा कोणतंही स्पष्ट कारण नसताना आपल वजन कमी होतं, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे वजन कमी होणं म्हणतात.

Image credits: pexels
Marathi

ताप

कर्करोग असलेल्या प्रत्येकाला कधीतरी ताप येतो, विशेषतः जर कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असेल तेव्हा.

Image credits: Freepik
Marathi

थकवा येणं

अत्यंत थकवा येणं, विश्रांती घेऊनही तो न जाणं हे कर्करोग वाढत असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. काही कर्करोगांमध्ये, ल्युकेमियाच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो.

Image credits: pexels
Marathi

त्वचेवर होणारे बदल

त्वचेच्या कर्करोगाबरोबरच, इतर काही कर्करोगांमुळे त्वचेत बदल होऊ शकतात.ज्यामध्ये त्वचा गडद होणं , त्वचा आणि डोळे पिवळे होणं, त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे अश्या समस्या निर्माण होतात.

Image credits: freepik
Marathi

मलमूत्र विसर्जनात होणारे बदल

लघवी करताना वेदना होणं, लघवीमध्ये रक्त येणं किंवा मूत्राशयाच्या कार्यात बदल होणं मूत्राशय किंवा प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित असू शकतं.

Image credits: Getty
Marathi

सततचा खोकला किंवा घशात होणारी खवखव

सतत खोकला येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षण असू शकतं. तुम्हाला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pexels

तुम्हाला जगातील महाग खजुराची किंमत माहिती आहे का ? वाचा सविस्तर

Astro Tips : जेवणानंतर ताटात हात धुतायत? शास्रात सांगितलेय हे नियम

महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी नक्की वाचा...

Plant Care : उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी घेण्यासाठी खास टिप्स