रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव खजूर खाऊन उपवास सोडतात. त्यामुळे खजुराला विशेष महत्व प्राप्त होते.डॉक्टर देखील खजूर खाण्याचा सल्ला देतात
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खजूर खाल्याने शरीरातील थकावट नाहीशी होते. त्यामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते.
भारतातील किंवा जगभरात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध आहे.. तसेच त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत.
खजुराच्या विविध प्रकारातून अजवा खजूर सगळ्यात उत्तम मानले जाते. त्यामुळे याची देखील तेवढीच महाग आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे.
अजवा खजूर शरीरासाठी सगळ्यात चांगले असल्याने भारतीय बाजारात याला विशेष मागणी आहे. त्यामुळे त्याची किंमतही जास्त असते.
काही रिपोर्टनुसार अजवा खजुराची किंमत चौदा हजार रुपयांपर्यंत नोंदवली गेली आहे.
अजवा खजुराचे दुसरे नाव मदिना आहे. कारण हे खजूर सौदी अरबच्या मदिना शहरातून येतात म्हणून याला हे नाव पडले आहे.