सध्या महिलांच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातेय. अशातच मुलीला शाळेत पाठवताना काही गोष्टी पालकांनी नक्की शिकवाव्यात.
बहुतांश पालक आपल्या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. पण मुलगी काहीतरी तुमच्याकडे शेअर करत असल्यास तिचे ऐकून घ्या.
मुलगी शाळेत जात असल्यास तिला आई-वडिलांपासून काहीच लपवून नये याबद्दल शिकवले पाहिजे. शाळा अथवा रस्त्यात तिच्यासोबत एखादी घटना घडल्यास त्यासंदर्भातही घरी सांगावे असे मुलीला शिकवा.
लहान मुलांना चूक आणि बरोबरमधील फरक लगेच कळत नाही. यामुळे पालकांनी मुलीला चुकीच्या गोष्टी कोणत्या याबद्दल सांगावे. याशिवाय चुकीची संगत वाईट असते हे देखील शिकवावे.
शाळेत जाणाऱ्या मुलीला आई-वडिलांसमोर स्वत:चे मत मांडण्यास शिकवा. हीच बाब घराबाहेर देखील लागू होते असेही मुलीला सांगा
मुलीला नेहमीच सतर्क राहण्यास शिकवा. यामुळे मुलीला स्वत:ची सुरक्षितता राखता येईल
लहान मुलीला स्वत:वरील आत्मविश्वास किती महत्वाचा याबद्दल सांगावे. यामुळे कोणत्याही संकटाचा सामना मुलगी खंबीरपणे करू शकते
मुलीला एका वयानंतर गुड टच आणि बॅड टचबद्दलही सांगावे.