26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. यावेळी भगवान श्रीकृष्णाची पूजा करत त्याला नैवेद्य अर्पण केला जातो. यावेळी पंचामृत कसे तयार करावे याची रेसिपी पाहूया.
अर्धा लीटर दूध, दही, तूप, साखर, तुळशीची पाने आणि गंगाजल, मध
सर्वप्रथम एका भांड्यात दूध आणि दधी एकत्रित मिक्स करा.
मिश्रणात एक मोठा चमचा तूप मिक्स करा.
पंचामृताच्या मिश्रणात मध आणि साखर मिक्स करुन सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
पंचामृतामध्ये तुळशीची पाने टाका. शक्य असल्यास गंगाजलही मिक्स करू शकता.
पंचामृत तयार झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा.