पनीर, हिरवी मिरची, ब्रेड, लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तेल, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ
सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. यानंतर लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची मिक्स करा.
तेलातील सामग्री व्यवस्थिती भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, काळी मिरी, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
पॅनमधील सामग्रीमध्ये पाणी मिक्स करुन शिजवा. आता पनीर किसून त्यामध्ये टाका. पनीरएवजी अंड देखील वापरू शकता.सर्व सामग्री शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करुन थंड होण्यासाठी ठेवा.
दोन ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यामध्ये स्टफिंग भरा. यानंतर ब्रेड दोन्ही बाजूने तव्यावर भाजून घ्या.
फ्रेंच टोस्ट एका प्लेटमध्ये काढून हिरवी चटणी अथवा सॉससोबत मुलांना डब्याला द्या. ही रेसिपी नाश्तावेळी देखील तयार करू शकता.