लग्नसोहळ्यासाठी अक्षया देवधरसारखी पैठणी साडी नेसू शकता. नववधू अथवा लग्नानंतरच्या एखाद्या सोहळ्यावेळी पैठणी साडी शोभून दिसेल. यावर गोल्डन ज्वेलरी घालू शकता.
बनारसी साडी प्रत्येक महिलेची पसंती असते. सिंपल आणि सोबर लूकसाठी पूजेवेळी बनारसी साडी नेसू शकता. यावर डायमंड अथवा मोत्याची ज्वेलरी ट्राय करुन पाहा.
पारंपारिक लूकसाठी ट्रे़डिशनल पद्धतीची कॉटनची साडी नेसू शकता. अक्षया नारंगी आणि हिरव्या रंगातील काठ असणाऱ्या साडीत फार सुंदर दिसतेय.
पूजेसाठी अथवा एखाद्या फंक्शनला हेव्ही वर्क असणारी साडी परफेक्ट आहे. यावर मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी घालू शकता.
रिसेप्शनवेळी अक्षया देवधरसारखा लूक रिक्रिएट करू शकता. अक्षयाने गळ्यामध्ये कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी घातली आहे. यामुळे लूक अधिक खुलून दिसतोय.
सिल्क अथवा सेमी सिल्कमध्ये येणारी काठपदाराची साडी लग्नसोहळ्यासाठी बेस्ट आहे. अशाप्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
सध्या इरकल साडीचा ट्रेण्ड आहे. यामुळे सिंपल लूकमध्येही चारचौघात उठून दिसायचे असल्यास अक्षयासारखा लूक कॉपी करू शकता. या साडीवर एथनिक ज्वेलरी छान दिसते.