Lifestyle

Travel

New Yearमध्ये मनालीला फिरायला जाताय? अशा ठिकाणी जाणे टाळा

Image credits: freepik

गर्दीची ठिकाणे

मनालीमध्ये सध्या थंडीचा आनंद घेण्यासाठी बहुतांशजण गर्दी करत आहेत. यादरम्यान मनालीमधील हिडिम्बा देवी मंदिर आणि मॉल रोडसारख्या ठिकाणी गर्दी होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

Image credits: social media

अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये नववर्षात खूप बर्फ पडतो. यामुळे मनालीमध्ये पॅराग्लाइडिंग, ट्रेकिंगसारख्या अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करण्यापासून दूर रहा.

Image credits: freepik

रोहतांग पास

नववर्षात रोहतांग पासमध्ये खूप बर्फ पडतो. यामुळे भूस्खलन होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे रोहतांग पासमधील वातावरणाची स्थिती पाहूनच बाहेर पडण्याचा विचार करा.

Image credits: freepik

मार्गदर्शकाशिवाय प्रवास

नववर्षात मनाली आणि आसपासच्या ठिकाणी पर्यटक फिरायला जातात आणि हरवतात. अशातच स्थानिक मार्गदर्शकाशिवाय मनालीतील एखाद्या ठिकाणी प्रवास करणे टाळा.

Image credits: freepik

नद्या आणि झरे

मनीलामध्ये खूप झरे आणि नद्या आहेत. पण हिवाळ्यात येथील झरे गोठतात. यामुळे मनालीला जात असल्यास झऱ्यांजवळ जाणे टाळा. 

Image credits: freepik