उन्हाळ्याच्या दिवसात गडद रंगाचे कपडे घातल्याने नुकसान होऊ शकते. याबद्दल पुढे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात गडद रंग, खासकरुन काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. यामुळे उष्णता शोषून घेतली जाते. अशातच अंगाची ल्हाईल्हाई होते.
उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्याने शरीरातून अत्याधिक घाम बाहेर पडतो. यामुळे थकवा जाणवू शकतो. खरंतर, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
उन्हाळ्यात गडद रंगांच्या कपड्यांमधून अत्याधिक घाम निघत असल्यास डोकेदुखी, थकवा किंवा अन्य आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
काळ्या रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात. पण पांढरा किंवा पेस्टल रंगातील कपड्यांमुळे शरीरातून अत्याधिक घाम घेण्याची समस्या दूर राहते.
अधिक ऊन आणि घामामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशातच गडद रंगांचे कपडे ही समस्या अधिक वाढवू शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.