श्रावण महिना हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या काळात भक्त उपवास, व्रत-वैकल्यं करतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात.
श्रावणात सोमवारी शंकराची पूजा केली जाते, तसेच मंगळवार, गुरुवार, शनिवार उपवासही पाळले जातात. या उपवासात शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याची भावना असते.
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो, ज्यामुळे मांसाहार लवकर खराब होतो. यामुळे अन्न विषबाधा, अपचन, ताप किंवा फोड येण्यासारखे त्रास होऊ शकतात.
श्रावणात अनेक प्राणी प्रजननाच्या प्रक्रियेत असतात. त्यामुळे या काळात मासे, कोंबडी, शेळी यांना खाणे टाळल्यास त्यांच्या प्रजातींचे संरक्षण होते.
श्रावण हा आत्मशुद्धी, संयम, आणि साधनेसाठी आदर्श महिना मानला जातो. तामसी आहारामुळे मन अस्थिर होऊ शकते, म्हणून शुद्ध आहाराचं पालन केलं जातं.
लग्नसोहळ्यावेळी बेस्ट कपल लूक, पाहा पैठणी आउटफिट्सच्या डिझाइन्स
घरच्या घरी केस गळती कशी थांबवावी, उपाय जाणून घ्या
डेली वेअर ते ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे ट्रेन्डी Salwar Suits
Friendship Day 2025 साठी मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून द्या शुभेच्छा