तुमच्या या 7 सवयींमुळे ओठ होतात काळे, आजच करा बदल
गुलाबी ओठांसाठी तुम्ही दररोज मॉइश्चराइजर किंवा नैसर्गिक लिप बामचा वापर केला पाहिजे. मॉइश्चराइजर वापरताना ते केमिकल फ्री असेल याची काळजी घ्या. अन्यथा तुमचे ओठ काळे होऊ शकतात.
त्वचेसह ओठांना एक्सफोलिएट करणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही साखर आणि मधाचा वापर करून त्याचा स्क्रब ओठांना लावू शकता. यामुळे ओठ काळे होण्याची समस्या दूर होईल.
ओठ सतत चावल्याने ते काळे पडू शकतात. यामुळे ओठांवरील त्वचा कोरडी होण्यासह फाटण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांचे ओठ काळे होऊ लागतात. खूप प्रयत्न केल्यानंतरही ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येऊ शकत नाही.
त्वचेसह ओठांचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही अशा लिप बामचा वापर करा ज्यामध्ये 20 ते 30 टक्के एसपीएफ असेल.
काही लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो. यामुळे ओठ काळे होऊ शकतात. यासाठी केमिकल फ्री लिपस्टिकचा वापर करावा. अथवा नैसर्गिक लिप बामचा वापर करू शकता.
झोपण्यापूर्वी लिपस्टिक न पुसल्याने ओठ काळे होऊ शकतात. यामुळे मेकअप केल्यानंतर लिपस्टिकही व्यवस्थितीत पुसण्यास विसरू नका.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.