Lifestyle

Fashion

सिल्क साडीला स्टाइलिश लुक देण्यासाठी या टिप्स येतील कामी

Image credits: instagram

सिल्क साडी

सिल्क साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसली जाऊ शकते. खरंतर ट्रेडिशनल लुकसासाठी सिल्क साडी आवडीने नेसली जाते. पण तुम्ही पुढील काही टिप्सने सिल्क साडीला स्टाइलिश लुक देऊ शकता.

Image credits: instagram

सिल्क साडीची निवड

सुंदर लुकसाठी योग्य प्रकारची सिल्क साडी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या साडीत तुमचा लुक अधिक खुलला जाईल आणि तुमच्या स्किन टोनला मॅच होईल अशी सिल्क साडी खरेदी करा.

Image credits: instagram

ब्लाऊज

साडीवरील ब्लाऊजमुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलले जाऊ शकते. तुम्ही ब्लाऊजसाठी स्टाइलिश नेक शिवू शकता. याशिवाय साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊजही परिधान करू शकता.

Image credits: instagram

कंबरपट्टा

सिल्क साडीला मॉर्डन टच देऊ शकता. यासाठी कस्टमाइझ कंबरपट्टा साडीवर लावू शकता. रुंद स्ट्रीप किंवा ज्वेलरीच्या पॅटर्नमधील कंबरपट्ट्याची निवड करू शकता.

Image credits: instagram

हेअरस्टाइल

सिल्क साडीवर एलिगेंट लुकसाठी तुमची हेअरस्टाइलही व्यवस्थितीत असावी. यासाठी स्लिक हेअर स्टाइल किंवा बन भोवती गजरा किंवा गुलाबाची फुलं लावू शकता.

Image credits: instagram

ज्वेलरी

सिल्क साडीवर वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी शोभून दिसते. पण ट्रेडिशनल लुकसाठी साउत स्टाइल टेम्पल ज्वेलरीची निवड करू शकता.

Image credits: instagram