होळीच्या दिवशी करा हे 5 उपाय, नकारात्मक उर्जा होतील दूर
यंदा होळीचा सण 24 मार्चला साजरी केली जाणार आहे. खरंतर होळी पौर्णिमा खास असते. या दिवशी खास उपाय केल्याने नकारात्मक उर्जा दूर होऊ शकतात.
एखाद्याला वाईट नजर लागली असल्यास तुम्ही होळीच्या दिवशी तुरटीचा तुकडा सात वेळा अंगावरुन उतरवून होळीत टाका. यामुळे सर्व समस्या दूर होतील.
वडाच्या 11 पानांवर कुंकवाचा वापर करून त्यावर श्रीराम लिहून त्याची एक माळ तयार करा. ही माळ होळीच्या दिवशी हनुमानाला अर्पण केल्याने नकारात्मक आणि वाईट नजर दूर होण्यास मदत होईल.
होळीच्या दिवशी रात्री शंकराच्या मंदिरात सात हळकुंड एकत्रित बांधा. यानंतर हळकुंड घरातील दरवाज्यावर लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल.
होळीच्या रात्री 12 वाजता एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तूपाचा दिवा लावा. यामुळे सर्व नकारात्मक उर्जा दूर होतील.
काळ्या रंगाच्या कापडात तीळ, सात लवंग, तीन सुपारी, 50 ग्रॅम राई घेऊन त्याची एक पोटली तयार करा. ही पोटली अंगावरून सात वेळा काढून होळीत अर्पण करा. यामुळे आयुष्यातील समस्या दूर होतील.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.