अतिशय गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं काढून टाकतं, तर खूप थंड पाणी रक्ताभिसरणावर परिणाम करू शकतं. चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी सर्वोत्तम आहे.
हार्ड वॉटरमुळे त्वचेवर साबणाचे किंवा खनिजांचे थर बसू शकतात. सौम्य फेसवॉश वापरल्याने ते थर निघून जातात आणि त्वचा मऊ राहते.
वारंवार पाणी लावल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळाच चेहरा धुवा.
जर पाण्यात जास्त प्रमाणात मीठ किंवा क्लोरिन असेल, तर फिल्टर केलेलं किंवा उकळून थंड केलेलं पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा.
पाणी त्वचेतील ओलावा कमी करतं, त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.
अंघोळीनंतर चेहऱ्यावरचं पाणी जास्त वेळ ठेवू नका. सौम्य टॉवेलने हलक्या हाताने पुसा.
स्वातंत्र्य दिनासाठी हिरव्या रंगातील 5 साड्या, पाहा डिझाइन्स
१५ ऑगस्टनिमित्त असणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी खास Quotes
दररोज मेकअप करण्याचे काय तोटे आहेत?
अंगारकी चतुर्थीचे काय महत्व आहे, गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा सण