अंगारकी चतुर्थीचे काय महत्व आहे, गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा सण
Lifestyle Aug 12 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?
अंगारकी चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि शुभ मानला जाणारा दिवस आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ असे म्हणतात.
Image credits: Social media
Marathi
भगवान गणपती आणि मंगळाचा संबंध
‘अंगारकी’ हा शब्द ‘अंगारक’ म्हणजे मंगळ ग्रह यावरून आला आहे. मंगळ ग्रहाचा अधिपती गणपती मानले जातात. त्यामुळे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने मंगळदोष आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
Image credits: Social media
Marathi
उपवासाचे महत्त्व
अंगारकी चतुर्थीला उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. भक्त दिवसभर उपवास करतात, रात्री चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीची पूजा करून उपवास सोडतात.
Image credits: Social Media
Marathi
विशेष पूजा आणि मंत्रजप
या दिवशी गणपतीला दुर्वा, मोदक, लाडू अर्पण केले जातात. गणपती अथर्वशीर्ष, संकष्ट नाशन गणेश स्तोत्राचा जप केल्याने पापक्षालन होते आणि सुख-समृद्धी मिळते.
Image credits: Social media
Marathi
पुण्यफलाचे महत्त्व
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने हजारो चतुर्थ्यांचे पुण्य मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. हा दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी एक सुवर्णसंधी मानला जातो.
Image credits: Social media
Marathi
श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव
या दिवशी मंदिरे, गणपती मंडळे आणि घरोघरी भक्तीभावाने पूजा-अर्चा केली जाते. अंगारकी चतुर्थी हा फक्त धार्मिक नव्हे तर भक्तांच्या मनातील श्रद्धा, भक्ती आणि गणपतीवरील प्रेमाचा उत्सव आहे