झोपण्याच्या किमान ३०-६० मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बंद करा. स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे मेंदू अॅक्टिव्ह राहतो आणि झोप उशिरा येते.
दूधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे नैसर्गिक कंपाऊंड असते, जे शांत झोप येण्यास मदत करते. हर्बल टी (Chamomile Tea, Lavendar Tea) घेतल्यास मन शांत राहते आणि झोप पटकन लागते.
रात्री झोपण्याच्या २-३ तास आधी जेवण पूर्ण करा. गडद मसालेदार, तुपकट, तळलेले पदार्थ टाळा, कारण यामुळे अपचन होऊ शकते. हलकं जेवण केल्याने झोप लवकर येते आणि शरीर हलकं वाटतं.
झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटे ध्यान (Meditation) किंवा हलकी योगासने करा. स्ट्रेस मुळे झोप लागत नाही, त्यामुळे रिलॅक्स होणं महत्त्वाचं आहे. झोपताना छान शांत संगीत किंवा मंत्र ऐका.
झोपण्याच्या खोलीत प्रकाश कमी ठेवा. AC किंवा फॅनचा योग्य वापर करून खोली थंड ठेवा (18-22°C सर्वोत्तम). अंथरूण, उशी आरामदायक हवी, नाहीतर चांगली झोप लागत नाही.
सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम केल्यास झोप चांगली लागते. पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार वर्कआउट टाळा, कारण त्यामुळे मेंदू जागा राहतो.
दुपारी ३० मिनिटांपेक्षा जास्त झोप घेऊ नका. जास्त वेळ झोपल्यास रात्री झोप लागत नाही.
सोपी, आनंददायक किंवा प्रेरणादायी पुस्तके वाचा. रोज दिवसातील चांगल्या गोष्टी डायरीत लिहिल्यास मन शांत होतं आणि झोप पटकन येते.