हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण सकाळी लवकर उठून एक्सरसाइज किंवा वॉकसाठी जातात.सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करावीत जेणेकरुन हेल्दी राहण्यास मदत होईल याबद्दल जाणून घेऊया.
सकाळची सुरुवात भिजवलेल्या ड्रायफ्रुट्सने करा. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात फाइबर मिळतात.यावेळी बदाम, अक्रोड, मनुका भिजवून खाऊ शकता.
सकाळी उठल्यानंतर दररोज कमीत कमी 30 मिनिटे वॉक करा.दररोज सकाळी वॉक केल्याने मानसिक आरोग्य सुधारले जाते.
उठल्यानंतर स्ट्रेचिंग केल्याने शरीर फिट राहते.याशिवाय ताज्या आणि शुद्ध हवेमध्ये वॉक केल्याने मानसिक आरोग्य सुधारले जाते. याशिवाय फुफ्फुसाचे आरोग्यही हेल्दी राहते.
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात 1 ग्लास पाणी पिऊन करा. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.