कमी प्रमाणात तांदळाचा भात किंवा रोटी आपण आहारात घेऊ शकता. भरपूर भाज्या आणि सूप सुकटलेले फळ, ग्रीन सॅलड आणि लो फॅट दही खायला घेता येईल.
ग्रीन टी किंवा हर्बल टी, बदाम, अक्रोड किंवा फुटाणे किंवा भिजवलेले चणे किंवा मूग आहारात घेऊ शकता.
ग्रीन सॅलड आणि सूप, गोड पदार्थ टाळा आणि कमी मीठ वापरा. झोपायच्या आधी हळदीचे दूध पिऊ शकता.
साखरयुक्त पदार्थ आणि जंक फूड, गोड पेय (कोल्ड्रिंक्स, पॅक ज्यूस) आणि रात्री उशिरा जेवणे. तणाव आणि झोपेची कमतरता जाणवत राहते.
वजन कमी करण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि शारीरिक शिस्त महत्त्वाची आहे. फक्त डाएटिंग करून किंवा व्यायाम करून फायदा होणार नाही, तर दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे.