उरलेल्या भातापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकतो. पण भातापासून कधी डोसाची रेसिपी ट्राय केलीय का? याचीच रेसिपी पुढे पाहूया...
1 वाटी उरलेला भात, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, चिमूटभर बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ.
उरलेला भात मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याची पेस्ट तयार करा. यानंतर रवाही त्यामध्ये मिक्स करा.
डोसाच्या मिश्रणात दहीही मिक्स करुन 20 मिनिटांसाठी ठेवा. जेणेकरुन पीठामधील रवा फुलला जाईल.
डोसामध्ये बटाटा, मटार, कोथिंबीरची स्टफिंग तयार करून ठेवू शकता. अथवा स्टफिंगशिवाय चटणीसोबत डोसा खाऊ शकता.
20 मिनिटानंतर डोसाच्या पीठात बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करुन व्यवस्थितीत ढवळून घ्या.
नॉन स्टिक तवा गॅसवर गरम करुन त्यावर दोन थेंब तेलाचे घाला. यावर डोसाचे पीठ गोलाकारात पसरवून घ्या. डोसा भाजताना गॅस मंद आचेवर असू द्या.
डोसा व्यवस्थितीत भाजून झाल्यानंतर चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
केस गळतीपासून सुटका अशी मिळवावी, टिप्स जाणून घ्या
शालिनी पासीच्या सुंदर केसांचे सीक्रेट, ट्राय करा हा होममेड शॅम्पू
Chanakya Niti: शत्रूपासून सावध कसं राहावं, चाणक्य काय सांगतात?
मेंदी सेरेमनीसाठी बजेटफ्रेंडली Crop Top सूट, पाहा डिझाइन्स