रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी + लिंबाचा रस + मध पिल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करू लागते.
हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी लाभदायक असतात. १ चमचा हळद + २ चमचे दूध मिक्स करून १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
संत्री, पपई, डाळिंब, बीट, गाजर यांचे रस प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते. खूप प्रमाणात कॅफिन (कॉफी, चहा) घेणे टाळा, कारण ते त्वचेला कोरडे करते.
काकडी व आलोवेरा त्वचेला थंडावा देतात आणि ग्लो वाढवतात. २ चमचे काकडीचा रस + १ चमचा आलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.
आठवड्यातून २-३ वेळा नैसर्गिक स्क्रब वापरल्याने मृत त्वचा निघते आणि चेहरा उजळतो. उडीद डाळ + दही + मध मिक्स करून नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरा.
रोज किमान ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेला ग्लो येतो.
गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते आणि त्वचा फ्रेश ठेवते. कॉटनला गुलाबपाणी लावून हलक्या हाताने चेहरा पुसा आणि झोपा.