सकाळी ५:३० ते ६:३० दरम्यान उठल्याने शरीराला आणि मनाला ताजेपणा मिळतो. लवकर उठल्याने दिवसाची उत्पादकता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो.
उठल्याबरोबर कोमट पाणी किंवा लिंबूपाणी प्यावे, त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. हायड्रेशनमुळे त्वचा चमकदार होते आणि पचनसंस्था सुधारते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्व ‘ड’ मिळते. हे हाडांच्या मजबुतीसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे.
१०-१५ मिनिटांचे ध्यान मन शांत ठेवते आणि तणाव कमी करते. प्राणायामाने श्वसनसंस्था मजबूत होते आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
नियमित ३० मिनिटे व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते आणि ऊर्जा मिळते. स्ट्रेचिंग, वॉकिंग, किंवा हलका योग केल्याने शरीर लवचिक होते.
उन्हाळ्यात दह्यासोबत खा या गोष्टी, रहाल हेल्दी
वडापाव सोबत मिळणारी चटणी कशी बनवायची?
घरी आम्रखंड कसा बनवावा?
दररोज वेलचीचे पाणी पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे