उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर डाएटमध्ये फार बदल करावा लागतो. यावेळी बहुतांशजण दह्याचे सेवन करतात. पण उन्हाळ्यात दह्यासोबत तूप खाण्याचे फायदे माहितेयत का?
दह्यामध्ये व्हिटॅमिन सी, हेल्दी फॅट्स, कार्ब्स, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. उन्हाळ्यात दह्यामध्ये तूप मिक्स करुन खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध तूप आणि दही एकत्रित करुन खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाते.
उन्हाळ्यात दह्यासोबत खडीसाखर मिक्स करुन खाऊ शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
एका वाटीमध्ये दही आणि खडीसाखर मिक्स करुन घ्या. याचे सेवन केल्यानंतर तणाव कमी होण्यास मदत होते.
दह्यामध्ये आवळा पावडर मिक्स करुन खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो.
उन्हाळ्यात दही आणि आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.