वेलचीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. काहीजण माउथ फ्रेशरनसाठी देखील वेलचीचेच सेवन करतात.
दररोज वेलचीचे पाणी पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे पुढे जाणून घेऊया.
वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. याचे पाणी प्यायल्याने फॅट बर्न होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करू शकता. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर राहिल.
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वेलचीच्या सेवनाने तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होऊ शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.