चाणक्य म्हणतात की, जे लोक आपल्या आई-वडिलांची सेवा करतात आणि त्यांना आदर देतात, त्यांचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते. त्यांच्या आशीर्वादामुळे अडचणी दूर होतात.
चाणक्याच्या मते, आई-वडिल हे बालकाचे पहिले गुरू असतात. त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व घडते, त्यामुळे त्यांचा आदर करणे अत्यावश्यक आहे.
चाणक्य म्हणतात की, आईचे स्थान पित्या पेक्षा अधिक महत्त्वाचे आहे कारण ती जन्म देऊन आपल्या मूलासाठी सर्वस्व देणारी असते.
चाणक्याच्या मतानुसार, एक पिता आपल्या मुलासाठी ज्ञान, शिस्त, आणि जीवनातील योग्य मार्गदर्शन प्रदान करणारा असतो. पित्याच्या शिकवणीने मूल यशस्वी होऊ शकते.
चाणक्य म्हणतात की, जो मनुष्य आपल्या आई-वडिलांचा अनादर करतो, त्याला जीवनात कधीच यश मिळत नाही, आणि तो समाजातही आदर मिळवू शकत नाही.
चाणक्याचे विचार आपल्याला सांगतात की, आई-वडिल हे जीवनातील आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांचा सन्मान आणि सेवा केल्यानेच खरा धर्म पाळला जातो.
आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्ताला राजा बनवले होते. त्यांच्या नीतीची संपूर्ण जगभर चर्चा केली जाते.