नवरात्रीचे उपवास करताना काय करावे व काय करू नये? जाणून घ्या 10 गोष्टी
नवरात्रोत्सवादरम्यान तपस्या करणं महत्त्वपूर्ण मानले जाते.
नवरात्रोत्सवामध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. म्हणूनच उत्सवादरम्यान आपल्या आसपास राहणाऱ्या महिलांचा सन्मान करावा.
नवरात्रोत्सवादरम्यान सकाळी लवकर उठून आंघोळ करणं भाग्यासाठी शुभ मानले जाते.
देवीची पूजा करताना आपण अखंड ज्योतीचा संकल्प करणार असाल तर दिवा दक्षिण-पश्चिम दिशेमध्ये ठेवावा. तसंच दिव्याची ज्योत देखील संपूर्ण दिवस तसंच रात्र पेटत राहील, याची काळजी घ्यावी.
नवरात्रोत्सवादरम्यान सामान्य नव्हे तर सैंधव मिठाचा वापर करावा.
नवरात्रोत्सव साजरा करताना नऊ रंगाचे पालन करावे. तसंच कोणत्याही वाईट व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवावे.
देवी मातेच्या नैवेद्यामध्ये लसूण तसंच कांद्याचा समावेश करणं टाळावे. नैवेद्याचीही खास काळजी घ्यावी.