धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे कित्येक जण नैराश्य, ताणतणाव यासारख्या मानसिक आजारांना बळी पडले आहेत. मानसिक तणाव निर्माण झाल्यास शरीरामध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात? जाणून घेऊया.
शरीर एखाद्या आजाराला बळी पडल्यास त्यानुसार लक्षणे-संकेत दिसू लागतात. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
मानसिक तणाव सहन करण्यापलिकडे गेल्यास साधारणतः राग येऊ लागतो. हे तणावाचे मुख्य लक्षण आहे. या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवा.
मानसिक तणावाचे वाईट परिणाम शरीरावर दिसू लागतात. तणावामुळे मुख्यतः खांद्यांचे दुखणे खूप वाढते.
तणावामुळे शरीरातील कित्येक हार्मोनची पातळी असंतुलित होऊ लागते. यामुळे शरीराच्या पचनप्रक्रियेच्या कार्यातही अडथळे निर्माण होतात.
तणावामुळे व भूतकाळातील अनुभवांमुळे काहींना मनातील भावना व्यक्त करणे कठीण जाते. ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर परिणाम होतात.
तणावामुळे भूकेवरही परिणाम होतात. शरीराला अन्नाचा पुरवठा होत नसल्याने अवयव, हाडे, स्नायू देखील कमकुवत होऊ लागतात.
मानसिक तणावामुळे काहींना जेवण्याची इच्छा होत नाही. यामुळे खाण्यापिण्याच्या वेळेवर परिणाम होतात व शरीराच्या भूकेचं चक्र बिघडते.
शरीर निरोगी राहावे, यासाठी नियमित व्यायाम करणे व पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. मानसिक तणाव जाणवत असल्यास मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लान आखा. एकटे राहणे टाळा.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.