आरोग्य हेल्दी राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. यामुळे डाएटमध्ये पोषण युक्त फूड्सचा समावेश करावा.
बहुतांशजणांना पेरू खाणे पसंत असते. याचा फायदा आरोग्याला होतो. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई असते.
भाजलेला पेरूमध्ये फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने तो भाजून खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
भाजलेल्या पेरूमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
भाजलेल्या पेरूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात, यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. याशिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
भाजलेले पेरू खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते. यामधील कॅल्शियम आणि फॉस्फोरस हाडांसाठी फायदेशीर ठरते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.