Marathi

लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाय

कामामध्ये लक्ष केंद्रित होत नाहीय? ऑफिस डेक्सवर ठेवा ही 8 रोपे

Marathi

स्नेक प्लाँट

स्नेक प्लाँटमुळे हवा शुद्ध होण्यास मदत मिळते. कमी सूर्यप्रकाश व कमी पाण्यामध्येही या रोपाची चांगली वाढ होते. हे रोपे दिसायलाही खूप आकर्षक आहे.

Image credits: Getty
Marathi

पीस लिली

पीस लिली हे हवा शुद्ध करणारे रोप म्हणून ओळखले जाते. या रोपावर उगवणारी पांढऱ्या रंगाची फुले देखील खूप सुंदर असतात.

Image credits: Getty
Marathi

स्पायडर प्लांट

स्पायडर प्लांटची देखभाल करणं अतिशय सोपे असते. या रोपामुळेही हवा शुद्ध राहण्यास मदत मिळते. या रोपामुळे मूडही चांगला राहतो.

Image credits: Getty
Marathi

बांबू प्लांट

बांबू प्लांट हे भाग्याचे प्रतीक मानले जाते. शिवाय या रोपाचीही देखभाल करणं सोपे असते. विशेष म्हणजे या रोपास मातीची आवश्यकता नसते. हे रोप पाण्यामध्ये ठेवले जाते.

Image credits: Getty
Marathi

ZZ प्लांट

ZZ प्लांटची पाने चमकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. हे रोप डेस्कवर ठेवल्यास तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

मनी प्लांट

शक्य असल्यास मनी प्लांट ऑफिस डेस्कवर ठेवू पाहा. या रोपामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते. माती किंवा पाण्यामध्येही मनी प्लांटची चांगली वाढ होते. 

Image credits: Getty
Marathi

सिंगोनियम प्लांट

शुद्ध हवा आणि भाग्योदयासाठी घरात किंवा ऑफिस डेस्कवर सिंगोनियम प्लांट ठेवू शकता. या रोपामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.

Image credits: Getty
Marathi

निवडुंग

बाजारामध्ये निवडुंगाचे झाड वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असते. या रोपास पाण्याची जास्त आवश्यक नसते. ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी हे एक परफेक्ट रोप आहे.

Image credits: Getty

मॉडर्न पारंपरिक लुक हवाय? मग खरेदी करा Rashmika Mandannaसारखे 10 ड्रेस

History Of Saree : साडी या पारंपरिक पोशाखाचा जन्म कसा झाला?

सावधान! पायावर पाय ठेवून बसण्याची आहे सवय? आरोग्यावर होतील दुष्परिणाम

तुम्हालाही सतत थकल्यासारखे जाणवते? मग नियमित करा ही योगासने