थांबा! शिजवलेल्या तांदळाचे पाणी फेकताय? असा 8 प्रकारे करा वापर
Lifestyle Dec 18 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
फेस पॅक
शिजवलेल्या तांदळाचे पाण्यापासून आपण फेस पॅक तयार करू शकता. तांदळाच्या पाण्यामध्ये मध आणि दही मिक्स करून फेस पॅक तयार करा. 20 ते 25 मिनिटे पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा.
Image credits: freepik
Marathi
केसांसाठी करा वापर
शिजवलेल्या तांदळाचे पाणी आपण केसांसाठीही वापरू शकता. हे पाणी थंड करून स्कॅल्पवर लावून हलक्या हाताने मसाज करा. थोड्या वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
Image credits: freepik
Marathi
कपड्यांसाठी तयार करा स्टार्च
शिजवलेल्या तांदळाचे पाणी फेकण्याऐवजी त्यात थोडेसे पाणी मिक्स करून कपड्यांसाठी स्टार्च तयार करा. यासाठी तांदळाच्या पाण्यात कपडे भिजत ठेवून सुकवा. यानंतर कपड्यांना कडक इस्त्री करावी.
Image credits: freepik
Marathi
कंडिशनर
स्प्रे बॉटलमध्ये शिजवलेल्या तांदळाचे पाणी भरा. थोडेसे साधे पाणी मिक्स करा. हेअरवॉशनंतर हे पाणी केसांवर लावा. यातील पोषणतत्त्वांमुळे केसांच्या समस्या कमी होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
लहान मुलांसाठी हे पाणी फायदेशीर
दात येईपर्यंत लहान मुलांना आपण शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिण्यास देऊ शकता. हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credits: freepik
Marathi
टोनर
चेहऱ्याची त्वचा स्वच्छ केल्यानंतर कापसाच्या मदतीने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावावे. थोड्या वेळानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे त्वचेचे पीएच लेव्हल सुधारण्यास मदत मिळू शकते.
Image credits: freepik
Marathi
भाज्यांसाठी करावा वापर
एखाद्या भाजीची ग्रेव्ही पातळ झाल्यास त्यामध्ये शिजवलेल्या तांदळाचे पाणी मिक्स करावे. यामुळे ग्रेव्ही जाडसर होण्यास मदत मिळू शकते.
Image credits: freepik
Marathi
कणिक मळण्यासाठी करा वापर
पोळीचे कणिक मळण्यासाठी पाण्याऐवजी शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे पोळ्या मऊ होतात व पोळ्यांची चव देखील वाढते.
Image credits: freepik
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.