Lifestyle

SKIN CARE TIPS

नितळ व चमकदार त्वचेसाठी वापरा हे आयुर्वेदिक फेस पॅक

Image credits: freepik

स्किन केअर रुटीन

एखाद्या कार्यक्रमासाठी स्पेशल लुक कॅरी करण्याच्या विचार आहात का? त्यासाठी चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देखील हवाय? मग आतापासूनच हे फेस पॅक लावण्यास सुरुवात करा.

Image credits: freepik

चंदनातील औषधी गुणधर्म

चंदनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी अतिशय लाभदायक आहेत. म्हणूनच आयुर्वेदिक उपचारांमध्ये चंदनास खूप महत्त्व आहे.

Image credits: Getty

चेहऱ्यावर येईल चमक

चंदनाचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील डाग, मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. तसंच सलग काही दिवस उपाय केल्यास त्वचेचा पोत देखील सुधारेल.

Image credits: pexels

डेड स्किन

त्वचेवरील मृत पेशींच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास चंदन फेस पॅकचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करावा.

Image credits: pexels

सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय

चंदनामध्ये अँटी- एजिंग गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

Image credits: social media

त्वचा होते मऊ

चंदनामध्ये एक्सफॉलिएटिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे डेड स्किनची समस्या दूर होऊन त्वचा मऊ होण्यासही मदत मिळते.

Image credits: shweta tiwari instagram

त्वचेवरील दाह होतो कमी

चंदनाच्या लेपामुळे त्वचेची होणारी जळजळ, शरीरातील उष्णता यासारख्या समस्येपासून सुटका मिळून त्वचेला थंडावा मिळतो.

Image credits: Instagram

मुरुमांपासून मुक्तता

चंदन, मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्रित करून त्वचेवर लावल्यास मुरुमांच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

Image credits: freepik

असे तयार करा फेस पॅक

एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा मुलतानी माती एकत्रित करुन त्यामध्ये कच्चे दूध मिक्स करा. फेस पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा.

Image credits: freepik

त्वचा दिसेल फ्रेश

थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.

Image credits: kajol instagram

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty