आयुष्यात गरीबी येण्यामागे ही आहेत कारणे
घराच्या दरवाज्याला विनाकारण कुलूप लावल्याने देवी लक्ष्मी दारातूनच माघारी जाते. यामुळे घरात पैशांची भरभराट होत नाही.
तुमच्या घरात बिघडलेले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स तुमच्या गरीबीचे कारण ठरू शकते. यामुळे घरात पैसाही टिकून राहत नाही.
आंघोळ केल्यानंतर बादली पालथी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे कधीच पैशांची भरभराट होत नाही. बाथरुममधील पाण्याची बादली नेहमीच भरेलली ठेवावी.
तुमच्या घरात नळ किंवा पाण्याच्या टाकीमधून पाणी वाहत असल्यास तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
केसांवर कंगवा केल्यानंतर केस त्यामध्ये अडकले जातात. याकडे बहुतांशजण दुर्लक्ष करतात. कंगव्यावर केस ठेवणे दारिद्र्याचे लक्षण असल्याचे मानले जाते. यामुळे घरात पैसा टिकून राहत नाही.
सूर्यास्तानंतर कधीही कोणाला पैसे देऊ नयेत. यामुळे धनाची हानि होते. याशिवाय सूर्यास्तानंतर दूध व दही देखील देऊ नये.
हिंदू धर्मानुसार, गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी केस व नखं कापू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होण्यासह घरात आर्थिक समस्या वाढल्या जातात.
कपाटाच्या दरवाज्यावर कधीही चावी लावून ठेवू नये. वास्तुशास्रानुसार, कपाटाला चावी लावून ठेवल्याने घरात पैसा टिकत नाही असे मानले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.