Marathi

Weight Loss

काहीही केलं तरीही वजन कमी होत नाहीयं? असू शकतात ही 6 कारणे

Marathi

व्यायाम

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. पण सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो व्यायाम करत आहात तो योग्य पद्धतीने करत आहात की नाही हे पाहा. यासाठी जिम ट्रेनरची मदत घ्या.

Image credits: Freepik
Marathi

नाश्ता

सकाळच्या नाश्ता पोटभर करावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. पण बहुतांशजण सकाळचा नाश्ता न करताच घराबाहेर पडतात. यामुळे नाश्ता करावा आणि यावेळी फळं, ज्युस किंवा ड्रायफ्रुट्स खा.

Image credits: social media
Marathi

खाल्ल्यानंतर झोपणे

 खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने वजन कमी होत नाही. याचा उलट परिणाम शरीरावर होतो. खाल्ल्यानंतर झोपण्याऐवजी वज्रासनाच्या स्थितीत 10-15 मिनिटे बसा. 

Image credits: Freepik
Marathi

तणाव

वजन कमी करायचे असल्यास अत्याधिक ताण घेतल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तणावाच्या स्थितीत बहुतांशजण भरपूर खातात. यामुळे वजन वाढले जाते. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा. 

Image credits: Freepik
Marathi

ओव्हनचा वापर

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी न होण्यामागील आणखी एक मोठे कारण म्हणजे ओव्हनचा वापर करून पदार्थ तयार करणे. ओव्हनमधून काही रेडिएशन बाहेर पडतात जे अन्नातील पोषण तत्त्वे नष्ट करतात. 

Image credits: Freepik
Marathi

झोप

हेल्दी राहण्यासह वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणाची समस्या वाढली जाऊ शकते. यामुळे दररोज पुरेशी झोप घ्या. 

Image credits: Freepik
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty