Marathi

केक तयार करण्यासाठी खास टिप्स

घराच्या घरी केक तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. पण केक रेसिपीमध्ये काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

Marathi

केकसाठी लागणारे साहित्य

सर्वप्रथम केकसाठी लागणारे साहित्य एकत्रित जमा करून घ्या. सामग्रीचे प्रमाण तपासा. त्यानंतरच रेसिपी करण्यास सुरुवात करा.

Image credits: Getty
Marathi

सामग्री फेशच असावी

केक तयार करण्यासाठी ताज्या सामग्रीचाच वापर करावा. यामुळेच चविष्ट केक तयार होईल.

Image credits: Getty
Marathi

पीठ निवडताना काळजी घ्या

आरोग्यासाठी पोषक असेल अशाच पद्धतीच्या पिठाचा वापर करावा. महत्त्वाचे म्हणजे पीठ योग्य प्रमाणातच घ्यावे.

Image credits: Getty
Marathi

अंड्यांचा वापर

केकमध्ये अंडे वापरणार असाल तर लगेच फोडून केकच्या बॅटरमध्ये मिक्स करा. काही जण अंडे बराच वेळ आधी फोडून ठेवतात व त्यानंतर केकच्या बॅटरमध्ये मिक्स करतात. यामुळे चव बिघडली जाते.

Image credits: Getty
Marathi

बॅटर किती वेळ फेटावे?

सॉफ्ट केक तयार करण्यासाठी बॅटर जास्त वेळ फेटू नका. कारण यामुळे परफेक्ट बॅटर तयार होणार नाही.

Image credits: Getty
Marathi

सामग्रीचे प्रमाण

केक तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीचे प्रमाण व्यवस्थितच असणे गरजेचं आहे. प्रमाण चुकल्यास केक अधिक कडक किंवा मऊ होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

बेकिंग सोडा

केक तयार करताना बेकिंग सोडा फ्रेशच असावा. बेकिंग सोडा फ्रेश नसल्यास केक पूर्णतः बिघडू शकतो.

Image credits: Getty
Marathi

ओव्हनचे तापमान

केक तयार करण्यासाठी ओव्हनचा वापर करत असाल तर त्याचे तापमान नीट सेट करा. केक करपणार नाही, याची काळजी घ्यावी.

Image credits: Getty
Marathi

टुथपिकचा वापर

केक व्यवस्थितीत तयार झाला आहे की नाही? हे तपासण्यासाठी टुथपिकचा वापर करावा. टुथपिक सहजरित्या केकच्या आतमध्ये शिरल्यास केक तयार झाला आहे, असे समजावे.

Image credits: Getty

झटपट वजन कमी करायचंय? मग आजच घरात लावा हे 7 औषधी वनस्पती

Subrata Roy : सुब्रत रॉय यांचे या सायलेंट किलर आजारामुळे झाले निधन

सुब्रत रॉय-स्वप्ना यांच्या प्रेमकहाणीसमोर फिल्मी प्रेमकथाही ठरेल फेल

Bhaubeej 2023 : बहिणीने टिळा लावल्यास कसा होतो भावाचा भाग्योदय?