काय सांगता! या देशात पडलाय अंड्यांचा तुटवडा
रशियात काही ठिकाणी अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथील दुकाने किंवा अन्य स्टोअर्समध्ये अंडी मिळत नाहीयेत. याशिवाय अंडी खरेदी करण्यासाठी नागरिकांची लांबलचक रांग लागते.
रशियात अंडी न मिळण्यामागील कारण म्हणजे देशाचे युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध. देशातील बहुतांश ठिकाणी अंड्यांचा पुरवठा देखील केला जात नाहीयं.
अंड्यांच्या किंमतीत सातत्याने चार आठवड्यात चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला (2023) रशियात अंड्यांच्या किंमतीत 42 टक्क्यांनी अधिक महाग झाली आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनसोबत रशियाचे युद्ध सुरू झाल्यानंतर येथील आर्थिक निर्बंधांमुळे बाजारात अंड्यांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झालेला नाही.
अंड्याच्या कमतरतेमुळे अंडी विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अंड्यांचा व्यवसाय बंद पडला गेलाय.
अंड्यांचा रशियात पुरवठा होत नसल्याने यापासून तयार करण्यात येणाऱ्या रेसिपीही नागरिकांना खायला मिळत नाहीयेत.