Lifestyle

Fashion

पार्टी-फंक्शनसाठी सेलेब्सचे हे Velvet Dress देतील किलर लुक

Image credits: Instagram

ड्युअल शेड्स व्हेलवेट साडी

काजोलने निळ्या आणि मरून रंगातील व्हेलवेट साडी नेसली आहे. ड्युअल शेड्समधील साडी तुम्ही एखाद्या नाइट पार्टीसाठी नेसू शकता. यावर सिल्व्हर रंगाची ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: instagram

को-ऑर्ड ड्रेस

मोरपिशी-निळ्या रंगातील दीपिकासारखा को-ऑर्ड ड्रेस तुम्हाला वेगळा लुक देईल. व्हेलवेट फॅब्रिक कापडाच्या या ड्रेसवर तुम्ही गोल्डन रंगाची ज्वेलरी वापरू शकता.

Image credits: Instagram

व्हेलवेट साडी

काळ्या रंगातील व्हेलवेट साडीत रेखा फार सुंदर दिसतेय. एखाद्या पार्टी किंवा लग्नसोहळ्यासाठी सिंपल व्हेलवेट साडी नेसून त्यावर मोत्याची ज्वेलरी घालू शकता.

Image credits: instagram

व्हेलवेट जॅकेट

साडीसोबत तुम्ही व्हेलवेट स्लिव्ह ब्लाऊज किंवा जॅकेट परिधान करू शकता. माधुरी दीक्षित सारखा लुक तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी रिक्रिएट करू शकता.

Image credits: instagram

आलिया कट व्हेलवेट ड्रेस

आलिया भट सारखा व्हेलवेट सूट तुम्ही परिधान केल्यानंतर सुंदर दिसाल. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने आलिया कट व्हेलवेट ड्रेसचा पर्याय निवडू शकता. या ड्रेसवर मोठे झुकमे छान दिसतील.

Image credits: Instagram

अनारकली सूट

जांभळ्या रंगातील व्हेलवेट सूटमुळे तुम्हाला रॉयल लुक मिळेल. कफ्तान पद्धतीचे स्लिव्हऐवजी तुम्ही हातभर स्लिव्हचा ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर डायमंड ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

व्हेलवेट अनारकली सूट

ऑफ व्हाइट रंगातील व्हेलवेट सूटवर तुम्ही जांभळ्या रंगातील दुपट्टा परिधान करू शकता. या लुकमध्ये तृप्ती डिमरी सुंदर दिसत आहे.

Image credits: Instagram

मरून रंगातील लेहंगा

मरून रंगातील व्हेलवेट लेहंगा तुम्हाला रॉयल लुक देईलच. या ड्रेसमध्ये चारचौघांचे लक्ष तुमच्याकडे वेधलेही जाईल. या लेहंग्यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी आणि मोठे झुमके नक्की ट्राय करा.

Image credits: instagram

व्हेलवेट लेहंगा

कियारा अडवाणीने परिधान केलेल्या काळ्या रंगातील व्हेलवेट लेहंगामध्ये तुमचा लुक किलर दिसेल. या लेहंग्यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: instagram

लेहंगा विथ जॅकेट

शिल्पा शेट्टीचा हा लुक तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी रिक्रिएट करू शकता. भगव्या रंगातील व्हेलवेट लेहंग्यावर अभिनेत्रीने मॅचिंग ट्यूब टॉप आणि लांब जॅकेट परिधान केले आहे.

Image credits: instagram