शिल्पा शेट्टीसारखी फिगर हवीय? करा हा डाएट प्लॅन फॉलो
अभिनेत्री शिल्पा शेट्टी 45 वर्षांची झाली आहे. पण अभिनेत्रीच्या फिटनेसमुळे तिचे वय वाढलेले दिसत नाही. संतुलित डाएट, जिम, योगाच्या मदतीने शिल्पा शेट्टी स्वत:ला तंदुरुस्त ठेवते.
शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक आहे. शरीराला टोण्ड ठेवण्यासाठी अभिनेत्री कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. याशिवाय शिल्पा शेट्टी स्विमिंग, धावणे आणि सायकलिंगही करते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी दररोज 30-40 मिनिटे योगा देखील करते. योगासनांचा अभ्यास केल्याने शरीर लवचीक होणे, मन शांत राहणे आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
शिल्पा शेट्टी सर्व प्रकारचे फूड्स खाते. पण योग्य आणि संतुलित डाएट फॉलो करते. आपल्या आहारात अभिनेत्री प्रोटीन, कार्ब्स व काही पोषण तत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करते.
शिल्पा शेट्टी सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि चार थेंब नोनी ज्युसने करते. नोनी ज्युसमध्ये अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. जे शरीराला काही आजारांपासून दूर ठेवतात.
शिल्पा सकाळच्या नाश्तामध्ये ओट्स, मुसळी, ब्लू बेरी व सफरचंदाचे सेवन करते. दुपारच्या जेवणात ब्राउन राइस, चिकन किंवा मासे व एक चमचा तूपाचे सेवन करते.
संध्याकाळच्या नाश्तामध्ये अभिनेत्री एवोकाडो सँडविच व बीटाच्या ज्युसचे सेवन करते. रात्रीच्या जेवणात सूप किंवा चिकनचे सेवन करते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.