Marathi

घराच्या आजूबाजूला चुकूनही लावू नका ही 6 झाडे, उद्भवतील आर्थिक समस्या

Marathi

काटेरी झाडे

वास्तुशास्रानुसार, घराच्या आजूबाजूला किंवा घरात कधीच काटेरी रोप अथवा झाड लावू नये. यामुळे नात्यात सातत्याने वाद होतात.

Image credits: social media
Marathi

मेंदीचे झाड

वास्तुशास्रानुसार, घराच्या आजूबाजूला चुकूनही मेंदीचे झाड लावू नये. यामुळे नकारात्मक उर्जा येतात. याशिवाय कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

Image credits: social media
Marathi

चिंच

घराच्या आजूबाजूला कधीच चिंचेचे झाड लावू नये. वास्तुशास्रानुसार, चिंचेचे झाड लावल्याने घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करतात.

Image credits: social media
Marathi

कापूस

कापसाचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. पण घराच्या आजूबाजूला कापसाचे झाड असणे वास्तुशास्रानुसार अशुभ मानले जाते.

Image credits: social media
Marathi

सुकलेली झाडे

घराच्या आजूबाजूला कधीच सुकलेली झाडे ठेवू नयेत. अशा झाडांची छाटनी करावी. अन्यथा तेथे एक नवे रोप लावावे.

Image credits: social media
Marathi

बोनसाई

बोनसाईचे रोप घरात फार सुंदर दिसते. पण घराच्या आजूबाजूला किंवा घरात बोनसाईचे रोप लावत असाल तर घराची प्रगती होत नाही.

Image credits: social media
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: freepik