नवरात्रीत कन्यापूजनाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कन्यापूजन केल्या नंतर देवीला अर्पण केला जाणारा शृंगार कन्यांना दिला तर खूप शुभ मानल जात. शृंगार सामग्री भेट म्हणून देऊ शकता.
नवरात्रीत कन्यापूजन करताना फळ आवश्य दिले पाहिजे. यामागची कथा देखील आहे की,चांगल्या कर्माचे फळ आपल्याला चांगलेच मिळेल. त्यामुळे भेट म्हणून फळे आवश्य द्या.
स्टेशनरी वस्तूंची देखील भेट तुम्ही कन्या पूजनाच्या वेळेस देऊ शकता. कारण या वस्तू त्यांना शालेय जीवनात दैनंदिनमध्ये उपयोगी पडतात.
कन्यापूजन झाल्यानंतर कन्यांना कॉईन्स म्हणजेच पैसे किंवा दक्षणा दिली पाहिजे यात, लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.
कन्या पूजन झाल्यानंतर तुम्ही कन्यांना भेट म्हणून पुस्तक देखील देऊ शकता, जेणे करून त्यांना अभ्यासात मदत होईल
नवरात्रीत आलेल्या कन्यांचे पूजन केल्या नंतर त्यांचे तोंड गोड करण्यासाठी आपण मिठाई देतोच , मात्र हीच मिठाई तुम्ही भेट वस्तू म्हणून देऊ शकता.
लहान मुलं हे क्रीएटीव्ह असतात त्यामुळे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी हि संपूर्ण किट तुम्ही देऊ शकता.
लाल रंगाची ओढणी देणे खूप शुभ मानले जाते. कन्यांना या लाल रंगाची ओढणी दिली तर देवीची कृपा सदैव तुमच्यावर राहील अशी मान्यता आहे
अनेक मान्यता नुसार घरात आलेल्या कन्यापूजन साठी कन्यांना छोटासा दागिना भेट म्हणून दिला तर देवीची कृपा तुमच्यावर राहील.