अयोध्येत रामललांचा पहिल्यांदाच जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यामुळे अयोध्येतील भाविकांमध्ये रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
रामनवीमिनित्त रामललांना दुग्धस्नान घालण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
देशभरात 17 एप्रिलला रामनवमी साजरी केली जात आहे. अशातच अयोध्येतील राम मंदिरातील रामललांसाठी खास तयारी केली जात आहे. रामललांना खास वस्रही परिधान केले जाणार आहे.
रामललांना वेद मंत्रांच्या पठणासह दूधाने स्नान घालण्यात आले.
प्रभू श्रीरामांचा जन्म कर्क राशीत दुपारी 12 वाजताच्या अभिजीत मुहूर्ताव झाल्याचे सांगितले जाते.
अयोध्येतील राम मंदिरात रामललांचे सूर्य टिळक बुधवारी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी केदार, पारिजात, अमला, शुभ, वाशी, कहल, गजकेसरी आणि रवियोग तयार होणार आहे.
रामनवमीनिमित्त अयोध्येतील रामललांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. याशिवाय अयोध्येत रामनवमी मेळ्याचे आयोजन 20 एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.