वास्तुशास्रानुसार, तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते व नकारात्मक उर्जा नष्ट होते.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. तुळशीची पूजा केल्याने आयुष्यात आनंद येतो.
घरातील तुळशीच्या रोपाजवळ काही गोष्टी ठेवणे टाळा. यामुळे घरातील सुख-समृद्धी दूर होऊ शकते.
तुळशीजवळ चपला कधीच ठेवू नका. यामुळे तुळशीचा अपमान होतो व घरात दारिद्र्य येऊ शकते.
कधीही तुळशीची पाने शंकराच्या पिंडीवर अर्पण करू नका. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शकरांना तुळशीपासून दूर ठेवले जाते.
वास्तुशास्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ कोणतेही काटेरी रोप ठेवू नका. यामुळे परिवारातील सदस्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे रोपाजवळ चुकूनही केससूणी ठेवू नये. ही चूक केल्यास घरात आर्थिक समस्या वाढू शकतील.
तुळशीच्या रोपाजवळ कधीच केर-कचरा ठेवू नका. यामुळे भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतात व आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.