पीरियड्समध्ये चुकूनही डाएटमध्ये या पदार्थांचा करू नका समावेश, कारण रक्तस्त्राव वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Lifestyle Nov 28 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
पीरियड्समध्ये या भाज्या खाणे टाळा
फ्लॉवर, कोबी, ब्रोकली या भाज्यांमुळे पोट फुगणे व गॅसची समस्या अधिक प्रमाणात वाढू शकते. यामुळेच मासिक पाळीत या भाज्या खाणे टाळावे.
Image credits: Getty
Marathi
मशरूम
मशरूममध्ये फंगल एलिमेंट्स आढळतात, पाळीदरम्यान याचे सेवन केल्यास शरीरात रोगजंतू वाढू शकतात. तसेच पोटदुखीचीही समस्या उद्भवू शकते.
Image credits: Getty
Marathi
शतावरी
शतावरीमधील कम्पाऊंड्समुळे पाळीदरम्यान स्त्राव होणाऱ्या रक्ताला व लघवीला अतिशय विचित्र वास येऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
कच्चा कांदा
पीरियड्सदरम्यान कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या वाढू शकतात. शिवाय पोटही फुगू शकते.
Image credits: Getty
Marathi
कडधान्य व डाळी
काबुली चणे, राजमा, चणे-उडदाच्या डाळींचे सेवन केल्यास गॅसची समस्या वाढू शकते. पीरियड्सदरम्यान या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास शरीर जड झाल्यासारखेही जाणवते.
Image credits: Getty
Marathi
आंबट फळे-भाज्या
लिंबू, टोमॅटो यासारखे खाद्यपदार्थ खाल्ल्यास शरीरातील आम्लाची पातळी वाढू शकते. यामुळे अॅसिडिटी होऊन पोट-छातीच्या भागात जळजळ होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
मटार
मटार खाल्ल्यास पोटात पेटके येणे व पोट-ओटीपोट फुगण्याची समस्या वाढू शकते.
Image credits: Getty
Marathi
मिरची
पीरियड्सदरम्यान मिरची, शिमला मिरची यासारख्या तिखट गोष्टींचे सेवन केल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे शारीरिक त्रास अधिक वाढू शकतो.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.