काही मुलांचे अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष आणि मनं लागत नाही. काही गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते. सध्याच्या स्पर्धात्मक क्षेत्रामुळे मुलं तणावाखाली येतात.
मुलांचे अभ्यासात मनं लागण्यामागे काही कारणे असू शकतात. पण यावर वास्तुचे काही उपाय करू शकता. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
वास्तुशास्रानुसार, मुलं ज्या खोलीत अभ्यासासाठी बसतात तेथे नेहमीच आकाशी, गुलाबी अथवा पांढरा रंग भितींना असावा. येथे लाल, काळा अथवा कोणताही गडद रंग भितींना वापरू नये.
मुलांच्या खोलीत पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश आणि उजेड येण्याची सोय असावी. कमी प्रकाश असलेल्या खोलीत नकारात्मक उर्जा वास करते. यामुळे मुलांचे अभ्यासात मनं लागणे कठीण होऊ शकते.
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत देवी सरस्वती आणि गणपतीचा फोटो असावा. याशिवाय मुलांचा अभ्यासाचा टेबल चौकोनी आकाराचा ठेवा.
मुलांची अभ्यासाची खोली नेहमीच पूर्व दिशेला असावी. या दिशेचा स्वामी सुर्यदेव आहे. यामुळे उत्तर पूर्व दिशेला बसल्याने मुलांचे अभ्यासात मन लागेल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.