प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लवकरच येत आहे. या हप्त्याची माहिती जाणून घेऊयात
या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले आहेत.
शेतकऱ्यांनी 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू केली आहे. हा हप्ता ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना या योजनेमधून मिळणारे 6000 रुपये त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यात मदत करतात.
18 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल. या प्रक्रियेची अडचण कमी करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
PM किसान मोबाइल ॲपमध्ये उपलब्ध असलेले 'फेस ऑथेंटिकेशन फीचर' वापरून शेतकरी घरबसल्या चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे शेतकऱ्यांना OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय ई-केवायसी पूर्ण करता येईल. हे विशेषतः दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSCs) ला भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील पूर्ण करू शकतात.