सर्वप्रथम कवडे वाल 6-7 तासांसाठी भिजवून ठेवा. यानंतर कापडात बांधून ठेवा. यामुळे वालास मोड येतात. मोड आलेल्या वालांची साल काढून स्वच्छ करा.
Image credits: Facebook
Marathi
भाजीसाठी वाटण तयार करा
बारीक चिरलेला कांदा, मिरची, आले, लसूण, कढीपत्ता आणि नारळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. भाजीसाठी वाटण आवश्यक आहे.
Image credits: Instagram
Marathi
तेलात वाटण परतून घ्या
गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग टाकून कांदा परवतून घ्या. आता भाजीसाठी काढलेले वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
Image credits: Facebook
Marathi
वाटणात कडवे वाल मिक्स करा
वाटणाला तेल सुटल्यानंतर मसाले टाकून सर्व सामग्री व्यवस्थितीत भाजून घ्या. यामध्ये स्वच्छ केलेले कडवे मसाल्याच्या वाटणात घाला. वाल परतून घेऊन त्यात आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी घाला.
Image credits: Instagram
Marathi
गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा
भाजीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन त्यावरुन कोथिंबर टाकत गरमागरम भाकरीसोबत अथवा पोळीसोबत जेवणात वालाचे बिरडे खाण्यासाठी वाढा.