Marathi

Deep Amavasya 2024 दिवशी करा हे उपाय, दूर होतील आयुष्यातील संकटे

Marathi

दीप अमावस्या 2024

4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जात आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी दीप अमावस्येला कोणते उपाय करावेत हे पुढे जाणून घेऊया…

Image credits: Instagram
Marathi

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा

दीप अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप केल्याने पितृदोष कमी होऊ शकतो.

Image credits: Facebook
Marathi

शंकराची पूजा

दीप अमावस्येला भगवान शंकरांची पूजा करावी. पूजेवेळी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या वस्तू बेलपत्र, दूध, धतूरा अर्पण करावा.

Image credits: our own
Marathi

कुत्र्याला पोळी द्या

काळ्या रंगातील कुत्र्याला दीप अमावस्येवेळी पोळी खायला दिल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात असे मानले जाते.

Image credits: Facebook
Marathi

माशांना पिठाचे गोळे द्या

दीप अमावस्येला नदी अथवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खायला द्या. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो.

Image credits: Facebook
Marathi

पितरांसाठी या दिशेला लावा दिवा

दिप अमावस्येला पितरांसाठी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावावा. यामुळे पितरांची पूजा केल्यासारखे होते.

Image credits: Instagram
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Instagram