1 वाटी कुळीथ पीठ ,कोथिंबीर, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, लसूण, जीरे, हिंग, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल.
मिक्सरमध्ये लसूण, जीरे, कोथिंबीर, पाव चमचा मीठ घालून सर्व सामग्री बारीक करून घ्या. यावेळी आवश्यक असल्यास पाणी घाला.
एका प्लॅटमध्ये कुळीथ पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि तेलाचा वापर करत शिंगोळ्यासाठी तयार केलेला अर्धा मसाला मिक्स करा.
आता सर्व सामग्री व्यवस्थितीत एकत्रित करुन घट्ट पीठ मळून घ्या. यावेळी लक्षात ठेवा शिंगोळ्याचे पीठ अधिक घट्ट किंवा सैलसर मळू नये.
कढईत तेल गरम करुन त्यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट आणि शिंगोळ्यासाठी उरलेला मसाला घालून परतून घ्या. यामध्ये दीड ग्लास पाणीही घाला.
दुसऱ्या बाजूला शिंगोळे चकलीच्या आकाराचे तयार करून घ्या.
कढईत तयार केलेल्या रस्सामध्ये शिंगोळे टाकून शिजवून घ्या. शिंगोळ्याच्या रस्स्याला उकळी आल्यानंतर त्यावरुन कोथिंबीर घालून भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.