महाराष्ट्रात सांडग्यांची भाजी अथवा आमटी बहुतांश जणांच्या घरी तयार केली जाते. आरोग्यासाठी पौष्टिक असणाऱ्या सांडग्यांची आमटी कशी तयार करायची याची रेसिपी सविस्तर जाणून घेणार आहोत.
1 कप सांडगे ,चार टिप्सून तेल, जिरे, मोहरी,अर्धा बारीक चिरलेला कांदा, हिंग, कढीपत्ता, लसूण, गोडा मसाला, लाल तिखट मसाला, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम कढईत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सांडगे घालून भाजा. सांडगे सोनेरी रंगाचे झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.
तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण, कांदा घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत भाजून घ्या. आता टॉमेटो घालून पाच मिनिटांसाठी शिवजून घ्या.
टोमॅटो मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये गोडा मसाला, लाल तिखट मसाला, शेंगदाण्याचे कूट घालत व्यवस्थितीत भाजून घ्या.
मिश्रणात तळलेले सांडगे घालून व्यवस्थितीत परतून घेतल्यानंतर आता गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
सांगड्यांच्या आमटीला उकळी आल्यानंतर बंद करा. आमटी वाटीत काढून त्यावरुन कोथिंबीर टाकून भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.