आचार्य चाणक्य भारतातील महान विद्वानांपैकी एक होते. त्यांनी आपल्या नितीमध्ये कोण आपला आणि कोण परका व्यक्ती असतो याबद्दल सांगितले आहे.
आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसङ्कटे ।
राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः
अर्थ- आजार, दु:ख, दुष्काळाची स्थिती, संकट, शासकीय कामे व स्मशानात कामी येईल तो सच्चा साथी आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी दु:ख येते. आचार्य चाणक्यनुसा, जो व्यक्ती दु:खावेळी सोबत राहतो तोच तुमचा खरा पाठिराखा असतो.
दुष्काळ पडल्यानंतर जो व्यक्ती तुमचे पोट भरण्यासाठी मदत करतो तोच तुमचा खरा आयुष्यभराचा साथीदार असतो.
आचार्य चाणक्यनुसार, जो व्यक्ती तुमच्यासोबत आजारपणात सोबत आणि मदत करतो तोच तुमचा सच्चा साथीदार आहे.
एखाद्यासोबत तुमचे वाद झाल्यानंतर तुमच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा व्यक्ती सच्चा मित्र असतो हे लक्षात ठेवा.
एखाद्या कोर्टकचेरीच्या खटल्यात अडकल्यानंतर तुमची सर्वोतोपरी मदत करण्यासाठी उभा असलेला व्यक्ती सच्चा हितचिंतक असतो.
परिवारातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला एकटे वाटू न देणारा व्यक्ती आयुष्यातील खरा मित्र म्हणावा.
दांडियावेळी लेहेंगा नव्हे साडीला 6 हटके पद्धतीने करा ड्रेप, खुलेल लूक
देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ही स्पेशल खीर, पाहा Recipe
कुठे मिळाला होता कोहिनुर हिरा, कोण होत पहिलं मालक?
Diwali 2024 निमित्त सजावटीसाठी 8 डिझाइनर Curtains, वाढवतील घराची शोभा